
अमळनेर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढत्या महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. मोदी सरकार जनतेची मस्करी करीत असल्याने आज जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंप तसेच मुख्य बाजारपेठ येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

यावेळी अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पाटील, शहर उपाध्यक्ष राजु शेख, राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष डॉ. रहेमान खाटीक, माजी युवक अध्यक्ष सईद तेली आदी मान्यवरांनी हजेरी लावून मोहीमेचे कौतुक केले. या स्वाक्षरी मोहीमेच्या यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसचे जिल्हासचिव हर्षल जाधव, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष राजु भाट, राकेश पाटील, संतोष पाटील, शाम बोरसे, कुणाल पाटील, मयुरेश पाटील, हर्षवर्धन ब्रह्मे, प्रमोद पाटील अहमद पठाण, अतुल भागवत, वेदांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रम घेतले.
