हजारो शिवभक्त होणार सहभागी. सर्व शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्यात येथील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान तर्फे दि.१३ ऑगस्ट रोजी वर्णेश्वर महादेव मंदिर ते जळोद भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील हजारो शिवभक्त या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. गेल्या १२ वर्षांपासून श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून कावड यात्रेची परंपरा सुरू आहे.
सर्व शिवभक्तांनी सकाळी ९ वाजेपर्यंत दगडी दरवाजा व श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे एकत्र जमावे. त्यानंतर वाहनाने जळोद येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात जाऊन तापीमाईचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर नदी पात्रातील पवित्र जल घेऊन कावड यात्रेचे वाजत गाजत परत अमळनेरच्या दिशेने प्रस्थान करण्यात येईल. कावड यात्रेत शहरासह सानेनगर, गांधली, सुंदरपट्टी, हेडावे, रढावण, नंदगाव, तासखेडा, अमळगाव येथील असंख्य शिवभक्त कावड यात्रेत सहभागी होणार आहेत. शिवभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन पवित्र श्रावण महिन्यात कावड यात्रेत सहभागी होऊन भगवान महादेवाचा आशीर्वाद व पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ज्यांना कावड यात्रेत पायी सहभागी होणे शक्य नाही, त्यांनी १३ ऑगस्ट रोजी जळोद मार्गावर सकाळी ११ ते २ वाजे दरम्यान शिवभक्तांची भेट घेऊन यात्रेला शुभेच्छा द्याव्यात, असे कावड यात्रेचे प्रमुख शिवभक्त सुभाष पाटील, भिकन वाडीले, सुशिल भोईटे यांनी कळविले आहे.