प्रताप महाविद्यालयात उमवि अंतर्गत आंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धा संपन्न

धुळे विभाग प्रथम तर एरंडोल विभाग द्वितीय

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समिती द्वारा प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर आयोजित आंतर विभागीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन काल दि.२२ रोजी प्रताप महाविद्यालय येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य हर्षवर्धन जाधव तर स्पर्धेचे उद्घाटक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील होते. जळगाव,धुळे, एरंडोल, नंदुरबार असे चार विभागीय संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत धुळे विभागाने प्रथम क्रमांक तर एरंडोल विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खा.शि. मंडळाचे सचिव प्रा.पराग पाटील, सहसचिव डॉ.विजय मांटे, एरंडोल विभाग क्रीडा समिती सचिव डॉ.देवदत्त पाटील, निवड समिती सदस्य डॉ.आनंद उपाध्याय, डॉ. हसीन तडवी, धुळे विभाग सचिव डॉ. हर्षदा पाटील, विद्यापीठ अधिसभा सदस्य व जिमखाना समन्वयक डॉ.संदीप नेरकर, संघ व्यवस्थापक डॉ. नीलिमा पाटील, डॉ. विनय पवार, डॉ. नरेश बागल, डॉ.योगेश ठाकूर, डॉ. अमोल अहिरे, उप प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उप प्राचार्य डॉ.कल्पना पाटील, उप प्राचार्य डॉ.धनंजय चौधरी, उप प्राचार्य डॉ. योगेश तोरवणे, उप प्राचार्य व क्रीडा संचालक प्रा. अमृत अग्रवाल, डॉ. सुनिल राजपूत, डॉ. अमोल मानके, डॉ.संतोष दीपके, डॉ. किरण सूर्यवंशी, प्रशांत देवकाते, पंच अजय पाटील, सुरज मोरे, कार्तिकी काळे आदींसह खेळाडू, प्रेक्षक उपस्थित होते. डॉ. सचिन पाटील, प्रा. अर्चना सचिन पाटील आणि जिमखाना समिती यांनी स्पर्धा नियोजनकामी सहकार्य केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!