माऊली भजनी मंडळाची कार्यक्रमाला मोलाची साथ

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता म्हणजे मनाला आनंद देणारा पण तितकाच हुरहुर लावणारा क्षण. गेले दहा दिवस जानवे येथील कुलदैवत “आई भवानी” मातेची भक्ती, व श्रद्धेने गावातील प्रत्येक घराघरात भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले. भजन, किर्तन, अन्नदान आणि अखंड चालणारा हरिनामाचा जप यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. कार्यक्रमाला तालुक्याचे ज्येष्ठ नेते मा.आ. आबासाहेब डॉ. बी. एस. पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम बापू अहिरे बाहेरगावची पाहुणे मंडळी आदी उपस्थित होते.
माऊली भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य…
जानवे येथील “माऊली भजनी मंडळाची” कार्यक्रमाला मोलाची साथ लाभली. विणेकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य व टाळकरी, भालदार, चोपदार व साऊंड सिस्टिम या सर्वांचे येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकार महाराजांनी तोंड भरून कौतुक केले. मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प. जयेश महाराज दुसानेकर होते. सर्व कलागुणांनी युक्त असं भजनी मंडळ जानवे गावात आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन बाल गोपाल भजनी मंडळ लाभत आहे. गावाच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. पंचक्रोशीत तील काही भजनी मंडळांची सप्ताह साठी साथ लाभली.
महाप्रसादाचे मानकरी…
या वर्षी गं.भा. प्रमिलाबाई तुळशीराम मोरे, ह.भ.प. भिला तुळशीराम मोरे, सौ. ह.भ.प. सुनिताबाई भिला मोरे हे महाप्रसादाचे मानकरी होते.
जानवे गावात नवरात्र उत्सव काळात कुलदैवत आई भवानी मातेचा गेल्या २८ वर्षांपासून पुर्वापार किर्तन सप्ताह सुरु आहे. याचप्रमाणे दोन वर्षांपासून महाशिवरात्रीच्या पर्वात सुरु झालेला गावातील विठ्ठल रुक्मिणी माता मंदिराचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून दोन्ही किर्तन सप्ताह होतात. यात गावातील भाविक भक्तांचे सहकार्य असते. दोन किर्तन सप्ताहांमुळे गावातील भक्ती भावाचे तसेच एकोप्याचे कौतुक केले जाते. आई भवानी माता मंदिराचे व्यवस्थापन मंडळाने दहा दिवस उत्तम पद्धतीने व्यवस्थापन केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मोलाचे योगदान दिले. गावातील तरुण वर्गाचा उत्साह, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि माता भगिनींची निष्ठा यामुळेच हा सोहळा यशस्वीपणे पार पडला अशी माहिती जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डी. एम. पाटील यांनी दिली. विठुराया सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि समाधान देवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !