एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला अमळनेर येथे विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ

अमळनेर : येथील एस टी कामगारांनी एस टी चे राज्य शासनात विलनीकरण करावे या मागणीसाठी नागरी हित दक्षता समिती आणि विविध सामाजिक संघटना नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. विलानीकरणासाठी एस टी कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच असून या लढ्याला विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ लाभत आहे. अमळनेर बस स्थानकात शेकडोंच्या संख्येने एस टी कर्मचारी एकत्रित झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने मोर्चाचे नेत्यांना त्रिपुरा हिंदू मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा न काढण्याची नोटीस दिली. मात्र, संयोजकांनी मोर्चा काढण्यावर ठाम राहून मुस्लिम व हिंदू कर्मचारी एकत्रित पुढे येत ‘हम सब एक है !’ घोषणा देत बस स्टँड येथून मोर्चाला सुरुवात केली. धुळे रोडवरील विजय मारुती मंदिर, विश्राम गृह, बळीराजा स्मारक मार्गाने मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात नेण्यात आला.

प्रा.अशोक पवार मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कोणतेही आंदोलन मोर्चा शिवाय पूर्ण होऊच शकत नाही, एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या पाठीशी समाज उभा आहे !’ यावेळी युवा कल्याण फाऊंडेशन चे संदीप घोरपडे, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे बन्सीलाल भागवत, शेतकरी नेते अरुण देशमुख, मगन भाऊसाहेब, शशी पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर मोर्चाला पाठींबा देणाऱ्या सर्व संघटना व सामाजिक पदाधिकाऱ्यांचे आभार सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी मानले. या प्रसंगी मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन चे शेख रियाजुद्दीन, हजरतबाबा ताज फाऊंडेशन चे अँड रज्जाक शेख, प्रवासी संघटनेचे भास्कर बोरसे, हुसेनी सेना फाऊंडेशन चे मोईन अली, जेष्ठ कार्यकर्ते डी.एम.पाटील, मगन भाऊसाहेब, गोपीचंद शिरसाठ, मुरलीधर पवार, आनंदा हडप आदी मान्यवर सहभागी झाले होते. आंदोलनात होतात्म्य पावलेल्या कामगारांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून मोर्चा विसर्जित करण्यात आला.

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवाश्यांचे, जेष्ठ वृद्ध, लहान व्यापारी, विद्यार्थी, ग्रामीण लोकांची प्रचंड गैरसोय होत असून आर्थिक नुकसानही होत आहे म्हणून एस टी कामगारांच्या न्याय्य मागण्या शासनाने मंजून करून संप मिटवावा या मागणीचे निवेदन एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, एस टी कामगार संघटनांचे नेते यांचेसह नागरिकांच्या स्वाक्षरीने यावेळी प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी पुरवठा अधिकारी बावणे यांना देण्यात आले. मोर्चा यशस्वीतेसाठी प्रविण मिस्त्री, हेमंत सूर्यवंशी, रविंद्र संदानशिव, मनोज पाटील, आय.एस.शेख, जे.यु.पठाण, एस.टी.मोरे, बी.एस.वानखेडे, एस.सी.महाले, निलेश पोळ, एम.एफ.बागवान, गजानन सूर्यवंशी, योगेश घोडके, भावना सोनवणे, सविता पाटील, मंजुषा शिंदे, आशाबाई पाटील, वैशाली पाटील, शितल पाटील, दर्शन सोमवंशी, महेंद्र चौधरी यांचेसह कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!