अध्यक्ष पदी जितेंद्र झाबक यांना मान विश्वस्त पदी वसुंधरा लांडगे, उपाध्यक्ष पदी जितेंद्र देशमुख व माधुरी पाटील

अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक वादात अडकली होती. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीला मतदान चार दिवसांवर असताना स्थगिती मिळाली होती. त्यानंतर न्यायालयीन चौकशी आणि नंतर धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी अशा प्रक्रियेत निवडणूक अडकली होती. तद्नंतर खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक पार पडून ३ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात आली. यात सुरुवातीपासूनच आशीर्वाद पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली या निवडणूकीत सभासदांनी पुन्हा आशीर्वाद पॅनलला पसंती देेत सहकार पॅनलला सत्तेपासून लांब ठेवले. तर दिग्गजांचा पराभव झाला.
विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्ष पदासाठी नवा चेहरा जितेंद्र झाबक (१७७९), विश्वस्त पदासाठी हॅटट्रिक साधत वसुंधरा लांडगे (१८१७), उपाध्यक्ष पदासाठी नवा चेहरा जितेंद्र देशमुख (१७९८) व पुन्हा एकदा माधुरी पाटील (१७४१) यांचा समावेश आहे. तर पराभूत उमेदवारांमध्ये अध्यक्षपदासाठी किसन देवराम पाटील- लोण बु.(११४९) व विक्रम बिपिन शहा (५८५) बाद मते (२३६) विश्वस्त पदासाठी नवीन लालचंद लोढा (९००) व संतोष बाबुराव पाटील- बहादरवाडी (७२९) बाद मते (३०३) उपाध्यक्षपदासाठी संदीप केवलचंद जैन (१४२९) बाद मते (१२७५) याप्रमाणे समावेश आहे.
अन्य विजयी संचालकांमध्ये प्रदीप कुंदनलाल अग्रवाल (२२८२), हरी भिका वाणी (२०४०), डॉ. संदेश बिपीन गुजराथी (२००८), कल्याण साहेबराव पाटील (१८६४), विनोद राजधर पाटील (१८५१), निरज दीपचंद अग्रवाल (१८४२), डॉ. अनिल नथ्थू शिंदे (१८२४), योगेश मधुसूदन मुंदडा (१७७२) यांचा समावेश आहे.

पराभूत उमेदवारांमध्ये जितेंद्र मोहनलाल जैन (१७६३), डॉ. बी.एस.पाटील (१६९६), भरत घेवरचंद कोठारी (१५९९), प्रभाकर शंकर कोठावदे (१५९०), प्रवीण रामलाल जैन (१५६७), हेमंत भास्करराव पवार (१३१०), प्रसाद रमेशचंद्र शर्मा (११७१), गुलाबराव हिलाल पाटील (११५६), कमल आसकरण कोचर (७६१) यांचा समावेश आहे. एकूण २४३ मते बाद झालीत.
धर्मादाय आयुक्तांनी आठ मतांचा निर्णय वगळून निकाल दिला असताना खाशिच्या प्रशासनाने मतमोजणीचा निर्णय घेऊन रविवारी मतमोजणी करून घेतली आहे. कायदेशीर दृष्ट्या आठ मतांचा ठराव धर्मदाय आयुक्तांकडे मंजुर नसतानाही आठ मतांवर निवडणूक कशी घेतली ? हा मुद्दा घेऊन पराभूत उमेदवारांसह खाशि प्रेमी आणि हितचिंतक कोर्टाची पायरी चढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे खाशिचा निकाल जाहीर झाला असला तरी केव्हाही स्थगिती येवू शकते. साहजिकच नवनिर्वाचित संचालकांची निराशा होऊन आनंदावर विरजण पडेल असे बोलले जात आहे.