अमळनेर : येथील मराठा सेवा संघाची मासिक बैठक रविवार, दिनांक १४ रोजी येथे सामाजिक कार्यकर्ते शेतकरी मित्र सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. श्री स्वामी समर्थ केंद्र जवळील सानेगुरुजी सोसायटीत उज्वल शंकर पाटील यांचे निवासस्थानी बैठक झाली. सर्वप्रथम शिवश्री सुभाष पाटील, शिवश्री विनोद कदम, शिवश्री शांताराम पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना गायिली.
शिवांजली अर्पण…..
शिवसंग्राम चे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे यांच्या कारला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात होऊन त्यांचे अपघाती निधन झाले. या बैठकीत मराठा सेवा संघाच्या वतीने शिवांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सुभाष पाटील, विनोद कदम, पं.समिती चे पाटील सर, गजेंद्र साळुंखे, शांताराम पाटील (तात्या), सौ.वसुंधरा लांडगे, प्रा.लिलाधर पाटील, महेश पाटील, वैशाली शेवाळे, मनिषा सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक करताना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे यांनी संघामार्फत आगामी काळात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. शिवश्री प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी मराठा सेवा संघाचे नवीन सभासद जोडणी करुन सदस्यत्व स्विकारण्याचे आवाहन व अन्य विषयांवर मार्गदर्शन केले. याबाबत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. यानुसार दिनांक ४ सप्टेबर रोजी दु. २ ते ५ यावेळेत संघाच्या पदाधिकाऱ्यांसाठी कैडर कॅम्प घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. शेतकरी मित्र सुभाष पाटील यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा संदर्भात मार्गदर्शन केले.
उपस्थित नवीन सदस्यांचे स्वागत तसेच बैठकीचे यजमानपद स्विकारल्याबद्दल शिवश्री उज्वल शंकर पाटील यांचा कुटुंबियांसह यावेळी सत्कार करण्यात आला. बैठकीस मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, सचिव प्रेमराज पवार, कैलास पाटील, शांताराम पाटील (तात्या), प्रा.लिलाधर पाटील, अशोक पाटील, संजय सूर्यवंशी, दिपक काटे, वाल्मिक पाटील, श्रीकांत चिखलोदकर, कुणाल पवार, चंद्रकांत देसले, गजेंद्र साळुंखे, महेश पाटील, पाटील सर, सौ.वसुंधरा लांडगे, वैशाली शेवाळे, मनिषा सोनवणे आदी उपस्थित होते.