
अमळनेर : पुज्य साने गुरुजी यांच्या जयंती चे औचित्य साधत येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे, शिक्षकवृंद, विद्यार्थी यांनी पुज्य साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे भेट देऊन पुज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थित लेखक व सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर यांचेसोबत हितगुज केले.

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश भाई पाटील, लेखक तथा चित्रकार अनिल सोनार, सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद सराफ, चेतन भाऊ सोनार, स्मारक समितीच्या कार्यकर्त्या दर्शना पवार, गोपाळ नेवे, श्रीराम चौधरी, सुनिल पाटील, महाराष्ट्र शासनाचा नुकताच साहित्यिक पुरस्कार प्राप्त नवोदित लेखिका श्वेता पाटील आदींनी सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी हितगुज केले. याप्रसंगी सरस्वती विद्यामंदिर चे मुख्याध्यापक रणजीत शिंदे, उपशिक्षक आनंदा पाटील, उपशिक्षिका सौ.गीतांजली पाटील, उपशिक्षक ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर, तसेच सहकारी सौ.शितल पाटील, सौ. पुनम पाटील, मनोज बिऱ्हाडे यांचेसह सागर गुजर, किरण शिसोदे, किशोर महाजन, लकी पवार, शुभम चौधरी, कल्पेश पाटील आदी उपस्थित होते.