
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय व्यवस्थापन समिती नुकतीच जाहीर करण्यात आली. बिनविरोध निवड झालेल्या या समितीच्या अध्यक्षपदी दिनकर पवार तर उपाध्यक्षपदी सौ निताताई बाविस्कर यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीत सदस्यपदी सोनाली राहुल मराठे, कांचन ज्ञानेश्वर कोळी, आशा अरुण गोसावी, प्रतिभा विजय पाटील, सिकंदर शांताराम सोनवणे, किशोर पांडुरंग वाघ यांची निवड करण्यात आली. तज्ञ सदस्य पदी दिपक लोटन सूर्यवंशी तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून पूनम अशोक पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी वि. का. सोसायटीचे माजी चेअरमन कैलास पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे मावळते अध्यक्ष राहुल मराठे, संजय कापडे, राहुल सूर्यवंशी, अरुण गोसावी, हरीप्रसाद कापडे, योगराज शिरसाठ, भगवान पाटील, चंद्रकांत बाविस्कर, शिवाजी कापडे, दिपाली सोनवणे, सविता वाघ, आरती पाटील, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.