गावोगाव ची व्यथा मांडणारी सुंदर कविता.
कुठे नाहीत हो खड्डे? ते तर बेईमानांचे अड्डे
असं एक ही नाही गाव, जिथं नाही खड्डयांचं नाव
पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा, दूर ठेवला जातोय मुद्दा
तात्पुरती डागडुज्जी, सांभाळतो तुमची मर्जी
मग विरोध होतो लटका, द्यायला हवा हो फटका
नका भरू तुम्ही ही कर, मग बघू काय करणार
कुणी काढतो तिथं रांगोळी, कुणी चिखलात करी आंघोळी
कुणी लावतात त्यात झाडे, कुणी मोडून घेती हाडे
कुणाची लचकते मान, जा जवळून उडते घाण
कशामुळे हे सगळे होते ?, ठेकेदाराशी असते साटे लोटे
तुला किती अन् मला किती, संबधित असे भांडती
वापरती निकृष्ट माल, जनतेचे होती हाल
कोण आहे जबाबदार, शोधून काढील तोच हुशार
बरबरटला जर कारभार, काय करील जन- दरबार
व्हा निर्भय.. बुरखा हटवा, प्रतिकारी मशाली पेटवा
जो डरतो तोच अखेरी मरतो, हरणारा मागेच सरतो.