‘छत्रपती शिवाजी महाराज नसते.. तर आज आपण मंदिरात बसून सत्संग करु शकलो नसतो’ : प. पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदास महाराज

अमळनेर : ‘महाराष्ट्राची भूमी देशासाठी गौरवास्पद बाब आहे. कोठेही गेले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आवर्जून घेतले जाते. जर वीर बैरागी बंदा छत्रपती शिवाजी महाराज नसते.. तर आज आपण मंदिरात बसून सत्संग करु शकलो नसतो’ असे मत प. पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदास महाराज यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील झाडी येथील मंदिरावर होमहवन व प्रकाशभाई पाटील युवा मंचच्या झाडी शाखेचे फलक अनावरण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजराथ एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश (भाई) पाटील यांच्या अमळनेेर येथील जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ काल सकाळी १०.४८ वाजता संपन्न झाला. ‘जय श्रीराम’ चा नारा देत केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प. पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदास महाराज यांच्या शुभ हस्ते फीत कापून प्रकाश (भाई) पाटील युवा मंच जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाला. शुभारंभावेळीच गरजूंसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करुन प्रकाशभाईं नी खरं जनसेवेचं पहिलं पाऊल टाकून जनतेला सुखद धक्का दिला. ‘प्रकाश भाई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘ चा नारा देत या कृतीचे जनतेने जल्लोषात स्वागत केले. प्रकाश (भाई) पाटील युवा मंच चे श्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सकाळी ७ वाजता झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरावर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प. पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील झाडी येथील मंदिरावर होमहवन संपन्न झाले. त्यानंतर महाराजांच्या हस्ते प्रकाशभाई पाटील युवा मंचच्या झाडी शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी झाडी परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते. होमहवन झाल्यानंतर प. पू. महामंडलेश्वर श्री. अखिलेश्वरदासजी महाराज यांचे उपस्थितांनी आशीर्वाद घेतले. त्यानंतर महाराजांसोबत झाडी येथील तरुणांची मोटारसायकल रॅली अमळनेर शहरात पोहचली. हॉटेल मिडटाऊन येथून सकाळी १० वाजता घोड्यांच्या बग्गीवर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प. पू. महामंडलेश्वर श्री. अखिलेश्वरदासजी महाराज यांची मिरवणूक निघाली. मिरवणुकीत असंख्य महिला व पुरुषांचा समावेश होता. महिलांनी महामंडलेश्वर श्री. अखिलेश्वरदासजी महाराज व प्रकाश भाई यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी ठिकठिकाणी महाराज व प्रकाशभाई पाटील यांचे स्वागत करण्यात आले. वीजेच्या तालावर मिरवणुक मिडटाऊन हॉटेल – सुभाषचौक – स्टेशनरोडकडून तहसील कार्यालयाजवळील महाराणा प्रताप चौक मार्गे धुळे रस्त्यावरील शिवांश बिझनेस हब येथील कार्यालय स्थळी पोहचली. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महाराजांच्या हस्ते पूजाविधी करुन फीत कापून शुभारंभ करण्यात आला. शुभारंभावेळीच गरजूंसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करुन प्रकाशभाईं नी खरं जनसेवेचं पहिलं पाऊल टाकून जनतेला सुखद धक्का दिला. यावेळी पोलीस प्रशासनाने आपली चोख भूमिका बजावली.

मनोगत व्यक्त करताना प्रकाशभाई पाटील म्हणाले की, सुरत गुजरात ला माझे व्यवसाय आहेत. निवृत्तीनंतर मनात विचार आला की, कुदरतने मला भरपूर दिले आहे आता बेरोजगारी, शिक्षण व शेती प्रश्न सोडविण्यासाठी जन्मभूमीतल्या जनतेची सेवा करायची. त्यानुसार महिनाभरात बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळावे यासाठी उद्योग उभा करण्याचा मानस यावेळी व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. आज तुमची उपस्थिती पाहून माझ्यात विश्वास निर्माण केला की, तमाम समाज माझ्यासोबत आहे मी तुमची सेवा करु शकतो. मी एकटा काही करु शकत नाही तर मला पाहिजे फक्त तुमची साथ. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी विकास करुन दाखवणार अशी ग्वाही दिली. त्यानंतर महाराजांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले. जनतेने प्रकाश भाई सारख्या व्यक्तीला उपस्थितांकरवी साथ देण्याची शपथ दिली. यावेळी अनेकांनी प्रकाशभाई पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी उद्योगपती सरजू गोकलानी, माजी नगरसेवक लालू सैनानी, झाडी येथील जेष्ठ नेते धनगर दला पाटील, काँग्रेसचे नेते डॉ. अनिल शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) माजी नगरसेवक श्याम पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शिवसेना ( उबाठा) चे पारोळा येथील नेते हर्षल माने, येथील कॉन्ट्रॅक्टर शिरीष पाटील, डॉ. प्रशांत शिंदे, हरी भिका वाणी, पारोळा येथील भाजपचे ॲड. अतुल मोरे, उद्योजक वसंतबापू पाटील, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) चोपडा येथील नेत्या ज्योती पावरा (बारेला), सुरत येथील उद्योजक मित्र, सुरत येथील मित्रपरिवार, अमळनेर येथील प्रकाशभाई युवामंचचे प्रवीण देशमुख व युवा मंचचे सदस्य, सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील, गोवर्धन येथील शाम पाटील, झाडी येथील सरपंच डॉ. भुपेंद्र पाटील, गुणवंत पाटील, संतोष पाटील, अमळगावचे उदय नंदकिशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पवार, ढेकू चे नथू आण्णा पाटील यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठया संख्येने हजर होते. प्रकाशभाई पाटील युवा मंच यांनी केलेल्या आवाहनाला तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.