मिहीर देशमुख केंद्रांश दुसरा तर राज्यात ४६ वा

अमळनेर : येथील खा. शि. मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल मधील ९ विद्यार्थी मंथन सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षेत केंद्र स्तरावर बक्षिसासाठी पात्र ठरले आहेत. शाळेतील मिहीर देशमुख या विद्यार्थ्यांने राज्यात ४६ वा तर केंद्रात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे धिरज येवले, स्वामी पाटील, गणेश शिंपी, हर्षल पवार, हर्षल बारी, कुशल बडगुजर, प्रथमेश राठोड, पारस पाटील, दर्शन कासार, कैवल्य मराठे, प्रज्वल शिंपी या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक के. पी. पाटील, के. आर. बाविस्कर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.