प्रताप महाविद्यालयात दिनांक ५ व ६ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ; नि:शुल्क प्रवेश

करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम ; स्पर्धेचे सलग ९ वे वर्ष

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक ५ व ६ सप्टेंबर २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२४ होती. आतापर्यंत या स्पर्धेत राज्यातील ३५ महाविद्यालयांनी त्यांच्या प्रवेश पत्रिका पाठविलेल्या आहेत. ही स्पर्धा निःशुल्क असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या आणि महाराष्ट्रात गाजलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतापियन यशपाल पवार (UPSC), धनंजय कोळी ( PSI), आणि राजश्री पाटील (पोलीस) यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी असतील. त्यानंतर प्रश्न मंजुषा स्पर्धेची पहिली फेरी दिवसभर होईल, दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या दोन फेऱ्या घेऊन समारोप समारंभात या स्पर्धेचा निकाल घोषित करुन बक्षीस दिले जाणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस म्हणून … प्रथम- रुपये १० हजार, द्वितीय- रुपये ७ हजार, तृतीय – रुपये ५ हजार, उत्तेजनार्थ पहिले- रुपये २ हजार, उत्तेजनार्थ दुसरे- रुपये १ हजार याप्रमाणे बक्षीसासोबत सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या समारंभात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण या मुख्य संकल्पनेला अनुसरून दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी घेतलेली निबंध लेखन स्पर्धा आणि १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करियर कौन्सिलिंग सेंटर यांनी घेतलेली सामान्य बुद्धी मापन स्पर्धा परीक्षा या दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण केले जाणार आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या पूज्य सानेगुरुजी प्रश्नमंजुषा स्पर्धेला खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी. ए. निरज अग्रवाल आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे चिटणीस डॉ. अरुण. बी. जैन, सहसचिव डॉ. धिरज वैष्णव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, स्पर्धेच्या संयोजिका प्रा. वृषाली वाकडे यांच्यासह सर्व आयोजन समितीने केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!