युवा चैतन्य फाऊंडेशन तर्फे जि.प.मारवड शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जार व शैक्षणिक साहित्याचे वितरण

शाळेतील १३२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद शाळेत मारवड विकासमंच चे संस्थापक तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या कार्यातून प्रेरीत होऊन शाळेचे माजी विद्यार्थी, युवा चैतन्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक इंजि. परेश मगर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शाळेला दोन जार व शैक्षणिक साहित्य कीटचे वितरण काल दि.३ जुलै रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवड चे सरपंच भिकनराव पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख वैशाली पाटील, मारवड हायस्कूलचे माजी प्राचार्य एल.जी.चौधरी, युवा चैतन्य फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश मगर, फाऊंडेशनचे मार्गदर्शक सदस्य तथा सेवानिवृत्त शिक्षक किशोर मगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर पाटील, अमळनेर येथील पंकज भदाणे, मनोज बागुल यांचेसह मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, उपशिक्षक गिरीष पाटील, सविता पाटील, चेतना वानखेडे, सुधीर पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी माजी प्राचार्य एल.जी.चौधरी यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर मगर यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व इंजि.परेश मगर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करुन निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी व आभार गिरीष पाटील यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!