राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत खवशी जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील कार्तिक राकेश मराठे अमळनेर तालुक्यात प्रथम

जिल्हा परिषद शाळेतील चार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेच्या नावलौकिकात भर; ग्रामस्थांकडून कौतुक

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी चि. कार्तिक राकेश मराठे याने मिळविलेल्या यशाने खवशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा नावलौकिक प्राप्त झाला. चि. कार्तिक ने सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत अमळनेेर तालुक्यात प्रथम क्रमांक तर जळगाव जिल्ह्यात गुणवत्ता यादीत २० वा क्रमांक मिळविला आहे. खवशी येथील प्रगतशील शेतकरी राकेश मनोहर मराठे व जयश्री राकेश मराठे यांचा तो मुलगा आहे.

खवशी येथील शाळेतून या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी चि. कार्तिक राकेश मराठे, कु. गायत्री रविंद्र पाटील, कु. सुप्रिया हरिप्रसाद कापडे, कु. लावण्या दिनेश कापडे हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कार्तिकसह सर्व विद्यार्थ्यांनां त्यांचे वर्ग शिक्षक अरूण पवार, पुनम पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, शालेय समिती अध्यक्ष राहुल मराठे व सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून कार्तिकसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!