
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी सध्या शिरपूर स्थित अनिल भास्कर सूर्यवंशी यांच्या मातोश्री गं.भा. कुसूमबाई भास्कर सुर्यवंशी यांचे आज सोमवारी सकाळी ८.१० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. प्रशांत भास्कर सुर्यवंशी व अनिल भास्कर सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता खवशी येथील राहत्या घरुन निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !