‘प्रताप’ मध्ये राज्यशास्त्र विभागाचा परिचय व स्वागत समारंभ संपन्न; १०० विद्यार्थ्यांचा सहभाग

‘राज्यशास्त्र’ विषय बहुविद्याशाखीय दृष्टीने महत्वाचा : प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राज्यशास्त्र विभागाचा परिचय व स्वागत सोहळा कै. शंकरराव राणे सभागृहात नुकताच ३ सप्टेंबर रोजी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे होते. सोबत व्यासपीठावर प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, सिनेट सदस्य डॉ. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. डी. आर. चौधरी, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष प्रमुख डॉ.मुकेश भोळे, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अमित पाटील, ज्ञान संसाधन केंद्राचे प्रमुख प्रा.दिपक पाटील, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर, डॉ. सुनिल राजपूत, डॉ. राखी घरटे, डॉ. हर्ष नेतकर, प्रा.निर्भय सोनार, प्रा. रुपाली महाजन आदी उपस्थित होते. सर्व प्रथम सरस्वती देवी, कर्मयोगी श्रीमंत प्रताप शेठजी, पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. हर्ष अरुण नेतकर यांचे मार्गदर्शनाखाली कल्याणी महाजन,रुपाली संसारे, जोया पिंजारी यांनी स्वागतगीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कावेरी भोई यांनी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ जाधव म्हणाले की, हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांची ओळख, विषयाची ओळख या दृष्टीने महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांची प्रगती ही त्या त्या विषयाच्या आवडीवर आधारीत आहे याचप्रमाणे सर्वच विषय आज महत्वाचे आहेत. यामुळे अन्य विषयाचे महत्व कमी होत नाही, अशा विषयाचा देखील अभ्यास गरजेचे आहे. कारण आंतरविद्याशाखीय व बहूविद्याशाखीय विषयाचे महत्व अधोरेखित करता येते. एकूणच, राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या प्रगतीत योगदान दिले आहे.

कार्यक्रमात विशेष व्याख्याते म्हणून IQAC चे प्रमुख डॉ. मुकेश भोळे यांनी सांगितले की, उच्च शिक्षण सूक्ष्मपणे समजून घेतले पाहिजे तसेच NEP २०२३ जे राबविले गेले त्याचे सुद्धा आकलन केले पाहिजे. यासाठी शिक्षणातील 3+2, 4+1 पॅटर्न आणि प्रमाणपत्र, डिप्लोमा, डिग्री कोर्सचा अभ्यास जीवनाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त आहे. आपला ज्ञानात्मक प्रवास निरंतर सुरू असला पाहिजे. याचा एक भाग म्हणजे ऑनर्स व संशोधन डिग्री ची पद्धत सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ.विजय तुंटे यांनी दोन मुद्द्यांवर विद्यार्थ्याचे लक्ष केंद्रित केले. यात, राज्यशास्त्र विभागाची वैभवशाली परंपरा अबाधित राखणे महत्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अपयशाने न खचता, ताण-तणावाचा सामना सकारात्मक दृष्टीने करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकांनी ‘मानसिकसूत्र’ जोपासणे फार आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याचे सादरीकरण केले. यावेळी डॉ. राखी घरटे, प्रा. रुपाली महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी पाटील, लक्ष्मी पाटील, कल्याणी महाजन आदींनी सुंदर व कौशल्यपूर्ण स्वरूपाची रांगोळी काढली. साक्षी पाटील, लक्ष्मी पाटील, अमोल अहिरे, मनीष पाटील, गौरव सोनवणे, आकाश अहिरे, तुषार शिरसाठ, समाधान पाटील, योगिता पाटील, खुशी पाटील यांनी कार्यक्रम व्यवस्थापनाचे काम पाहिले. परिचय व स्वागत सोहळ्यासाठी १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आफ्रिन पठाण व श्वेता माळी यांनी केले तर रमा चव्हाण यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!