विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा ठराव पितांबर कापडे तर श्री गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेचा ठराव भूषण सूर्यवंशी यांचे नावाने

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होवू घातलेल्या सन २०२६ ते २०३१ पंचवार्षिक निवडणूक साठी नुकतेच दोन सहकारी संस्थांचे मतदान ठराव मंजूर करण्यात आले. खवशी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन सुर्यकांत बळीराम कापडे यांच्या अध्यक्षतेखाली ठराव मंजूरीसाठी सभा घेण्यात आली. खवशी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा ठराव श्री पितांबर वामन कापडे तर श्री गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेचा ठराव श्री भूषण भाईदास सूर्यवंशी यांचे नावाने सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी व्हा. चेअरमन सौ. सुमनबाई मधुकर पवार, संचालक डॉ. श्यामकांत विनायक देशमुख, गजानन नाना सूर्यवंशी, चंद्रकांत दंगल सूर्यवंशी, विश्वास वामन सूर्यवंशी, उषाबाई पितांबर कापडे, मीनाबाई आनंदा गोसावी, महेंद्र हरचंदपुरी गोसावी, नरेंद्र नारायण सूर्यवंशी, सचिव भरत पाटील व ग्रामस्थ संजय कापडे, सुनिल सूर्यवंशी, कमलेश सूर्यवंशी, पिंटू कापडे, अनिल शिरसाठ, आनंदापुरी गोसावी, मेहमूद पिंजारी, उमेश सूर्यवंशी, भानुदास पाटील, दिनकर पाटील, देविदास सूर्यवंशी, प्रसाद कापडे, राहुल सूर्यवंशी, नानू सूर्यवंशी, प्रताप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मतदान ठरावासाठी डॉ. श्यामकांत विनायक देशमुख यांनी श्री पितांबर वामन कापडे व भूषण भाईदास सूर्यवंशी यांचे नाव सुचविले. यास संचालक श्री गजानन नाना सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले. सभेला उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने सर्वानुमते कौल दिल्याने श्री पितांबर वामन कापडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दोघांच्या निवडीमुळे अनेकांनी समाधान व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला. मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिल्याबद्दल दोघांनी सर्वांचे आभार मानले. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.