श्रीमती भानूबेन शहा गोशाळा च्या कार्याची मान्यवरांनी घेतली दखल; अन्नक्षेत्र सुरुच ठेवण्याचे मोठे आव्हान

साई निर्मल फाउंडेशन तर्फे ‘कर्मवीर कोरोना योद्धा संस्था’ पुरस्काराने ई-सन्मान

अमळनेर : येथील गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अमळनेर शहरात कोरोना साथीत लॉकडाऊनच्या दोन टप्प्यात आजपर्यंत २ लक्ष ६९ हजार गरीब, गरजूंना अन्नदान केले गेले आहे. या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार, आजी माजी आमदार, नगराध्यक्षा,संस्था आदिंनी आपल्या लेखणीतून कौतुक केले आहे. साई निर्मल फाउंडेशन ने नुकताच ‘कर्मवीर कोरोना योद्धा संस्था’ पुरस्काराने ई-सन्मान जाहीर केला आहे. अन्नक्षेत्र उपक्रमास सार्वजनिक मदत निधी उभारून आणि वर्धमान संस्कार धाम मुंबई च्या सहकार्याने ५ एप्रिल पासून ३ मे पर्यत सुरू आहे. मात्र पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर झाल्याने गोशाळा व कार्यकर्त्यांपुढे २० केंद्रांवर ११ हजार लोकांसाठी अन्नक्षेत्र सुरु ठेवण्यासाठी मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. आता प्रशासन व दात्यांसह विप्रो कंपनीकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
जळगांव जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी वर्धमान संस्कार धाम मुंबई व गोक्षेत्र प्रतिष्ठाण च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या अन्न दानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले आहे. लॉक डाऊन वाढल्याने पुढील काळात आपले सेवा कार्य असेच सुरू ठेवावे अशी विनंती ही केली आहे. कोरोना १९ साथीच्या काळात सर्वसामान्य ६ हजार गरजू नागरीकांना रोजचे स्वादिष्ट भोजन देणे ही ईश्वर सेवा असून ह्या स्तुत्य उपक्रमाचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आहे. तर मुलाच्या जन्मदिवस निमित्ताने एक दिवसाचा अन्नदान खर्चही दिला. खासदार उन्मेष पाटील यांनी ही प्रत्यक्ष भेट देऊन जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे अन्नछत्र सुरू असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
आ.अनिल भाईदास पाटील, आ.स्मिताताई वाघ, लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पत्र देत या कार्याचा गौरव करतांना म्हटले आहे की, निस्वार्थ व निष्काम भावाने शिस्तबद्ध पद्धतीने जेवण तयार करून तितक्याच समर्पण भावनेने गोरगरीब लोकांच्या घरापर्यंत पोहचते तेव्हा त्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद व ते देत असलेले आशीर्वाद पाहून येथे भगवान महावीर यांचा वास आहे असे वाटते.
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनीही गोशाळेस आणि अन्नक्षेत्राच्या विविध केंद्रांवर भेटी देऊन, एक दिवसाच्या अन्नदानाचा खर्च दिला आहे. कोरोना शहरात पसरू नये म्हणून संस्थेचे व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे अशी भावना व्यक्त केली आहे. तर माजी आ.शिरीष चौधरी यांनीही आर्थिक सहकार्य करून अन्नक्षेत्र कार्याला पाठबळ दिले. प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनीही या कार्याची दखल घेत प्रशासनिक पातळीवर सहकार्य केले आहे.
गोरगरिबांना अखंडित सेवा देतांना समाजातून अनेक स्तरातून मदत मिळत होती. माझं गाव माझं अमळनेर व्हाट्सअप्प ग्रुप, पटवारी फ्रेंड्स ग्रुप, पु.सानेगुरुजी शिक्षक विचार मंच, प्रताप हायस्कूल १९९४ माजी विद्यार्थी ग्रुप, सोशल मीडियावर असलेल्या पाटील गढी ग्रुप यांनीही आर्थिक सहकार्य केले. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर संस्थान, गजानन महाराज मंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनीही एक दिवसाचा अन्नदानासाठी पुढाकार घेतला होता. याशिवाय व्यक्तीशः मा आ कृषिभूषण साहेबराव पाटील, रामभाऊ संदानशिव, डॉ.अनिल शिंदे, डॉ.मयुरी शिंदे, डॉ.संदिप जोशी यांच्या मेडिकल फाउंडेशन ने, न.प.गटनेते प्रविण पाठक यांनीही मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्नदानात योगदान दिले. नगरसेवक नरेंद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, प्रा.गणेश पवार, सुनिल चौधरी, उद्योजक सरजूशेठ गोकलानी, निरज अग्रवाल, पोलिस निरीक्षक कपिल कदम, सतिष संभाजी कदम, विपुल गारमेंट्स, रमेशशेठ जीवनानी, पिंपळे रोड परिसरातील नागरिक आदिंनी धान्य-वस्तुरुपाने तसेच रोखीने तर भारत गॅस, इंडेन गॅसचे दिनेशभाई यांनी गॅस सिलिंडर चे सहकार्य केले आहे. तर काशिनाथ चौधरी यांनी गोक्षेत्र प्रतिष्ठानला मदत म्हणून अन्न पोहचविण्यासाठी गाडी दिलेली आहे. या स्वेच्छा दान निधीच्या बळावर ३ मे पर्यंत अन्नक्षेत्र सुरू ठेवले आहे. मात्र यापुढे लोकडाऊन चा तिसरा टप्पाही जाहीर झाल्यामुळे १७ मे पर्यंत अन्नक्षेत्र सुरू ठेवून लॉक डाऊन मध्ये गोरगरिबांना भोजन पोहचविण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. आता गोक्षेत्र प्रतिष्ठाण ला प्रशासनासह अमळनेरातील दाते आणि दातृत्वासाठी विप्रो कंपनी कडून मदतीची अपेक्षा आहे. विप्रोशीही मदतीसाठीचा पत्रव्यवहार संस्थेने केलेला आहे असे श्रीमती भानूबेन शाह गोशाळेचे संचालक चेतन शहा, राजू सेठ ,चेतन सोनार, महेंद्र पाटील आदिंसह प्रा.अशोक पवार, संदिप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, डी.ए.धनगर आदिंसह कार्यकर्ते गोपाळ कुंभार, संजय धनगर, रोहित सोनार, उमेश सोनार, राहुल चौधरी, मनोज चौधरी आदिंनी सांगितले आहे

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!