राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भेट

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शरद पवार यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. यावेळी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्वांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला व मतदारसंघातील स्थिती जाणून घेतली. आपल्या अमळनेर मतदारसंघात आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ८० हजार दिनदर्शिका वाटप करण्याचे नियोजन केले आहे.

शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भेट

आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचीही भेट घेतली. कोरोना महामारी आल्यापासून निधी अभावी पाडळसरे धरणाचे काम बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे अजित पवारांनी तात्काळ वित्त विभागास ३५ कोटी निधी रिलीज करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर येत्या मार्च पर्यंत ६० कोटी निधी पाडळसरे धरणासाठी रिलीज करावेत अश्या स्पष्ट सूचना देखील त्यांनी केल्या. पाडळसरे प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागास दिले. सदर बैठकीत आ.अनिल पाटील, प्रकल्प संचालक शिंदे, डिझाइन चिफ इंजिनिअर, तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मुंडे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांना देखील पाडळसरे धरणाच्या कामास गती देण्याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले असून सुरुवातीला सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून वेळ पडल्यास केंद्रा कडून पैसा उपलब्ध करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची तयारी आपण ठेऊ असे संकेत त्यांनी आमदारांसह शिष्टमंडळाला दिले. 

कापूस व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

आमदार अनिल पाटील यांनी यावेळी अमळनेर येथे कापूस व मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री ना पवार यांनी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन यांना सुचना करून अमळनेर येथे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अमळनेरात सोमवार पासून मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिल्याने आमदारांसह शिष्टमंडळाने विशेष आभार व्यक्त केले. तर आ अनिल पाटील यांनी तात्काळ अमळनेर तहसीलदारांना भ्रमणध्वनी द्वारे मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश होऊन गोडावून देखील उपलब्ध झाले असल्याने सोमवार पासून खरेदी सुरू करावी अश्या सूचना केल्या.

यावेळी शिष्टमंडळात जिल्हा बँकेच्या संचालिका सौ तिलोत्तमा पाटील, प्रा.अशोक पवार, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, एस.टी.कामगार संघटनेचे एल.टी.पाटील, कृ.उ.बा.संचालक विजय पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, हिंमत पाटील, गौरव पाटील, श्रीनाथ पाटील, योगेश भागवत, हिरालाल भिल, मुशीर शेख, शेखर पाटील, गजानन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!