गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे काही वेेेेळात आग आटोक्यात

अमळनेर : तालुक्यातील खवशी गावालगत शेत असलेले शेतकरी भरत महादू पवार यांच्या शेतात आज ता.३० रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महावितरणचे पोल वरील तारा खंडीत होवून गव्हाचे शेतात आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ असतांनाच पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वारा असल्याने शेजारील शेतकरी जगतराव मधुकर पवार यांच्याही गव्हाचे शेतात आग लागली. लागलेल्या या आगीत सुमारे एक एकर गव्हाचे शेत जळून खाक झाले. धुराचे लोळ दिसताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केले. गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे काही वेेेेळात आग आटोक्यात आली व पुढील मोठा अनर्थ टळला.
या आगीत दोनही शेतकऱ्यांचे हजारो रुपयाचे नुकसान झाले. मोठ्या कष्टाने पिकविलेले पीक डोळ्यासमोर आगीत भस्मसात झाल्याने या शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील या शेतावरून गेलेल्या महावितरण च्या पोल वरील विद्युत तारा शाॅटसर्किटमुळे नुकसान झाले असल्याने पोल व तारा दुसरीकडे हलवणे संदर्भात यापूर्वी तक्रार अर्ज केेल्याचे कळते. कोरोना महामारीच्या या काळात झालेले नुकसान पाहून गावकर्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सदर शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
