अमळनेर तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शासन दरबारी लोकप्रतिनिधी, सरपंच व शेतकरी यांचा निवेदनांचा पाऊस


अमळनेर : गेेेले अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. दुुुबार पेेरणी करुन ही पिके वाया गेेेली. पाणी टंचाई होण्याची मोठी शक्यता आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा म्हणून पीकविमा मंजूर व्हावा, दुष्काळ जाहीर व्हावा, गुुुरांसाठी चारा छावण्या सुुुरु कराव्यात या मागण्यांसाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सरपंच व शेतकरी यांनी काल जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसील कार्यालयावर निवेदनांचा पाऊस पाडला. मारवड, कळमसरे, गोवर्धन, खेडी, वासरे परिसरातील काही शेतकरी बांधवांनी जळगांव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपली व्यथा मांडली. शासन दरबारी याची दखल घेऊन आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात हीच अपेक्षा आहे. काही शेेतकरी बाांधवांनी तालुक्याचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे.

तालुक्याचे ठिकाणी पातोंडा, अमळगाव, नगाव मंडळ भागातील पातोंडा सरपंच भरत बिरारी, उपसरपंच नितीन पारधी, खौशी सरपंच सौ.गौरी कैलास पाटील, उपसरपंच गणेश पाटील, गांधली सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच राजश्री महाजन, पिळोदे सरपंच भारती पाटील, उपसरपंच पद्मबाई पारधी, पिंपळी सरपंच प्रेमराज महाजन, उपसरपंच आबा बहिरम, जळोद सरपंच भारती साळुंखे, उपसरपंच कल्पनाबाई भोई, नगाव सरपंच महेश पाटील, खेडी सरपंच ज्ञानदेव पाटील, अमळगाव सरपंच मोरे, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागूल व विनोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर मोरे, महेंद्र पाटील, प्रविण लाड, राजेंद्र यादव, कैलास पाटील, अरुण देशमूख, ग्राम पंचायत सदस्य दिलीप पाटील, शितल पाटील, प्रतिभा शिंदे, मनिषा मोरे, रेखा पाटील आदी शेतकरी बांधवांच्या सहीचे निवेदन दिले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!