शिवक्षेत्र खवशी येथे ‘पाऊस बरसावा’ यासाठी होम हवन; आज सांगता

गावातील महिलांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेर : पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकरी व मजूर वर्ग चिंतातूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेेर तालुक्यातील शिवक्षेत्र खवशी येथे ‘पाऊस बरसावा’ यासाठी होम हवन करुन मरीआई मातेला साकडे घालण्यात आले. गावातील मरीआई माता मंदिराचे प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली पाच दिवस (दि.३० जुलै ते ३ ऑगष्ट) होम हवन करण्यात आले. आज पाचव्या दिवशी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मरीआई मातेची विधीवत पूजा करुन ओटी भरण्यात आली. गावातील महिलांच्या पुढाकाराने हा पाच दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात, प्रामुख्याने सौ.संगिता रघुनाथ पाटील, सौ.सविता प्रदीप पाटील, सौ.वंदना हरिविजय पाटील, श्रीमती सुनिता बळवंत पाटील, सौ.मंगलाबाई नंदकिशोर पाटील यांचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ईश्वर भास्कर बाविस्कर, राजेंद्र वसंत पाटील, सुर्यकांत विनायक पाटील, एकनाथ मोतीराम पाटील, अभिमन वामन कापडे, संदीप राजेंद्र पाटील, बापू कोळी, शेखर शास्त्री देशमुख, महेश सुर्यकांत कापडे आदींनी सहकार्य केले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!