उपविजेते : डॉ. रवींद्रनाथ गायकवाड व डॉ.अनुज नेते

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुका बॅडमिंटन असोसिएशन आणि मोहन पाटील बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॅडमिंटन स्पर्धा -२०२६ नुकतीच सारडा स्पोर्ट सेंटर, सिन्नर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप सूर्यवंशी व गौरव गोऱ्हे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद डॉ. रवींद्रनाथ गायकवाड व डॉ.अनुज नेते यांनी पटकावले. इंजिनिअर संदीप सूर्यवंशी हा अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांचा मुलगा आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी श्री नंदकुमार पाटील, डॉ. प्रणेश सानप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेते व उपविजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत सिन्नर मध्ये बॅडमिंटन सारख्या क्रीडा प्रकारांना अधिक चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

या स्पर्धेत अन्य नाशिक क्लबचे रत्नाकर आहेर, डॉ. मिलिंद गांगुर्डे, डॉ. रवींद्रनाथ गायकवाड, डॉ. अनुज नेते, सिन्नर येथील डॉ. आनंद नागरे, डॉ. प्रणेश सानप, डॉ. दीपक आव्हाड, श्रीकृष्ण आव्हाड, ब्रह्मराज गोरे, ऋषिकेश डोंगरे, आदित्य बोरकर, साई जाधव, स्वर्णिम महाले, ईश्वरी पवार, हेमांगी सानप आणि पूजा नागरे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सिन्नर तालुका बॅडमिंटन असोसिएशन आणि मोहन पाटील बॅडमिंटन अकॅडमीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंच, स्वयंसेवक, सहभागी खेळाडू, क्रीडाप्रेमी यांचे आभार मानण्यात आले.