राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता नव्याने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली घोषणा

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, देशभरातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे विनंती केली होती. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून “खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल.” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.
भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. सन १९२८ ते १९३६ दरम्यान भारताला तीन सुवर्णपदके मिळवूून दिली आहेेत. यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!