साई इंग्लिश अकॅडमी तर्फे मोफत निबंध स्पर्धेचे आयोजन

अमळनेर : येथील साई इंग्लिश अकॅडमी तर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शनिवार, दि.२ ऑक्टोबर रोजी मोफत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा असून दोन गटात स्पर्धा होणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट तर इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट असेल. दोन्ही गटांसाठी वेगळे विषय असतील.

लहान गट… इयत्ता पाचवी ते सातवी साठी विषय : १) मोहनदास ते महात्मा : प्रवास अहिंसेच्या पुजाऱ्याचा. २) महात्मा गांधीजींची दोन शस्त्र-सत्य व अहिंसा. ३) लाल बहादूर शास्त्री -मूर्ती लहान किर्ती महान. ४) आगळे वेगळे नेते – लाल बहादूर शास्त्री.

मोठा गट… इयत्ता आठवी ते दहावी साठी विषय : १) मजबूरी का नही, मजबूती का नाम गांधी..! २) गांधी विचारांचे जगाला आकर्षण. ३) राजकारणातील संत : लालबहादूर शास्त्री.

अमळनेर- धुळे रोड वरील डी.आर.कन्या शाळेमागील एम.जे.हॉल येथे शनिवार, दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता निबंध स्पर्धा होणार आहे. ईच्छूकांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साई इंग्लिश अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!