उत्कृष्ट नियोजनामुळे सानेगुरुजी शाळेतील महा लसीकरण अभियानास मोठा प्रतिसाद

अमळनेर : तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यात एकाच दिवशी सुमारे १८ हजार लसीचे डोस उपलब्ध करून महा लसीकरण करण्याचा उच्चांक गाठला आहे. शहरांतील सानेगुरुजी विद्या मंदिराच्या प्रांगणात आमदारांच्या हस्ते फित कापून महा लसीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंचावर आ अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ.तिलोत्तमा पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस. पातोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे, नगरपालिका रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.विलास महाजन, नर्सिंग स्टाफ च्या सुवार्ता वळवी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, सौ.रंजना देशमुख आदी उपस्थित होते.

आमदार अनिल पाटील म्हणाले की, लवकरच शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने विद्यार्थी, शिक्षक वृंद, वंचित राहिलेले नागरिक, दिव्यांग, गरोदर माता, शिक्षक वृंद आदींचे लसीकरण करण्यासाठी डॉक्टरांशी चर्चा करून हे महा लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. मतदारसंघात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी ज्या गावात लसीकरण अपूर्ण असेल त्याठिकाणचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर डॉक्टर्स आणि प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर टप्प्या टप्प्याने कॅम्प लावून लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याने आपला मतदारसंघ लवकरच १०० टक्के लसीकरण करण्यात अव्वल असेल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. लसींच्या उपलब्धतेबद्दल प्रशासनाचे आभार मानले.

सकाळी ९ वाजेपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. सदर शिबीर १८ वर्षे पेक्षा जास्त वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी खुले होते. शहरासाठी १० हजार तर ग्रामीण भागात सुमारे ८ हजार कोव्हीशिल्ड लसीचे डोस उपलब्ध केले होते. सानेगुरुजी शाळेतील लसीकरण केंद्रावर उन्हापासून बचावासाठी मंडप, पिण्यासाठी पाणी, गर्दी होऊ नये यासाठी आठ खोल्यांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली होती. ग्रामीण भागात कुऱ्हे बु,, देवगाव देवळी, गांधली, निंभोरा, झाडी, नगाव, कळमसरे, सडावन, फाफोरे याठिकाणी लसीकरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील म्हणाले की, आमदारांनी केवळ फोटो सेशन वा प्रसिद्धी हा उद्देश न ठेवता केवळ लसीकरणच नव्हे तर जनतेला आवश्यक सुविधाही दिली. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध, दिव्यांग व्यक्ती असेल तर आमदार त्यांना स्वतः भेटून लस टोचण्यासाठी आतमध्ये घेऊन जात होते. परिणामी सर्व स्वयंसेवक देखील याचपद्धतीने सेवा देत होते. यानिमित्ताने आमदारांनी खऱ्या अर्थाने जनतेची सेवा केली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचे सेवेचे धोरण जपले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महाआघाडीतील कार्यकर्त्यांनी तीन दिवसांपासून शिबिराची जोरदार तयारी सुरू केली होती, ‘मागेल त्याला लस’ हेच उद्दिष्ट होते, शांततेत व नियोजनबद्ध लसीकरण झाले, विशेष म्हणजे याठिकाणी लस घेण्यासाठी टोकन अथवा ऑनलाइन रजिस्ट्रेशन अशी कोणतीही अट नसल्याने नागरिक व महिला भगिनींना रांगेत उभे राहील्यानंतर अर्ध्या तासात लस मिळत होती. लसीकरण शिबिर यशस्वी होण्यासाठी आमदार पाटील हे स्वतः सकाळी ९ वाजेपासून शिबीर संपेपर्यंत लसीकरण केंद्रावर थांबले होते. उत्कृष्ट नियोजन असल्याने कोणताही गोंधळ उडाला नाही, यादरम्यान आमदार ग्रामीण भागातील लसीकरणाचाही आढावा घेत होते. अभियान यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, आशा वर्कर्स यांचेसह नगरसेवक, पंचायत समिती आणि जि.प.सदस्य, कृृृृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पोलीस प्रशासन आदींचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!