उपविभागीय अधिकारी यांना दिले मागण्यांचे निवेदन
अमळनेेर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. या घटनेचा विविध पक्ष व संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. विरोधी पक्ष नेत्या प्रियंका गांधींना शेतकरी बांधवांना भेटू न देता कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली. प्रियंका गांधींना अटक म्हणजे लोकशाहीचा खून असल्यामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात विरोधकांनी घोषणा देत काल रास्ता रोको आंदोलन केले. तहसील कचेरीवर जाऊन उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, सचिन पाटील, प्राध्यापक सुभाष पाटील, धनगर पाटील, प्रताप आबा, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, संजय पाटील, मुख्तार खाटीक, विनोद सोनवणे, डॉक्टर किरण नाना, यशवंत बैसाणे, मिलिंद भाऊसाहेब, तुषार संदानशिव, छोटू भाऊ, फिरोजभाई, मयूर पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे.