जि.प.शाळा, पिंगळवाडे चे शिक्षक प्रविण पाटील यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार जाहीर

अमळनेर : तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक प्रविण राजधर पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन आदिल शाह फारुकी बहुद्देशिय संस्था, अडावद ता.चोपडा या संस्थेतर्फे ‘खान्देश भूषण’ पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. आदिल शाह फारुकी बहुद्देशिय संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार दिले जातात.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत प्रविण पाटील हे आपले सामाजिक दायित्व निभावत असतात. पूज्य सानेगुरुजी युवा मंच मित्रपरिवाराच्या माध्यमातून सानेनगर-तांबेपूरा परिसरातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, वाचनालय व प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासतात. संस्थेचे अध्यक्ष फारुक शाह नौमानी व उपाध्यक्ष डॉ.जाविद शेख यांनी सदर पुरस्काराचे वितरण लवकरच केले जाणार असल्याचे दि.१५ अॉक्टोबर रोजी च्या पत्राद्वारे कळविले आहे. या यशाबद्दल अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, पिंगळवाडे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, उपशिक्षक रविंद्र पाटील, श्रीमती वंदना सोनवणे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या यशाबद्दल अमळनेर तालुक्यातील अधिकारी व शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!