
अमळनेर : येथील ढेकू रोडवरील भक्ती शक्ती स्मारक येथे दि.२२ ऑक्टोबर २०२१ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवराय यांच्या शिल्पाचे अनावरण तसेच लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांचे शुभहस्ते संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवराय यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांचे शुभहस्ते लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा अमळनेर नगरपरिषदेचे आरोग्य सभापती श्याम जयवंतराव पाटील यांनी केले आहे. राजमुद्रा फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक सेवाभावी कामे करत श्याम पाटील यांनी आपला ठसा उमटवला आहे.
