खा.उन्मेष पाटील यांची पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसोबत भेट व चर्चा

अमळनेर : पाडळसरे धरणाच्या पूर्तीसाठी राज्य शासनाने दिर्घ मुदतीचे कर्ज काढावं किंवा केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या सोबत मंत्रालयासमोर आंदोलन करू ! असे खा.उन्मेष पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात खा.उन्मेष पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी धरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून घ्या असे साकडे घातले. खा.उन्मेष पाटील यांनी धरणाच्या कामासाठी करीत असलेला पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली. तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक तो प्रस्ताव आणि आवश्यक त्या परवानगी पत्रांची पूर्तता तातडीने करावी किंवा ९ सप्टेंबर १०१९ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे यासाठी मंत्रालयात जाऊन धरण समितीसोबत आंदोलन करावे लागले तरी आंदोलन करू! असे खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले. यावेळी धरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सांगितले. तर रणजित शिंदे, अजयसिंग पाटील, सुनिल पाटील यांनी दरवर्षी शेकडो कोटींनी धरणाची किंमत वाढत असल्याचे सांगितले. यावेळी प्रशांत भदाणे, महेश पाटील, समितीच्या कार्यकर्त्या वसुंधरा लांडगे, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील, रियाज मौलाना, यांचेसह भाजप चे अॅड.व्ही.आर.पाटील, महेश पाटील, उमेश वाल्हे, युवा कार्यकर्ते तुषार पाटील आदिसह समितीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!