
अमळनेर : सालाबादाप्रमाणे शहरातील शिरुड नाका येथील दुर्गादेवी मंदिरापासून बलिप्रतिपदेला सम्राट बळीराजा ची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दोन बैलगाड्या सजवून त्यावर सम्राट बळीराजा ची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. सामाजिक कार्यकर्त्या सौ.वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना गायन केले. त्यानंतर आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, सुभाष पाटील, मनोहर पाटील, दिलीप पाटील, प्रा.अशोक पवार, कैलास पाटील यांनी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन केले. आमदार अनिल पाटील यांनी बैलगाडी हाकत मिरवणूकीस प्रारंभ केला. मराठा सेवा संघाचे कैलास पाटील यांनी शेतकरी गीते सादर केली. फटाक्यांची आतषबाजी करत सवाद्य मिरवणूक शिवाजी नाका, वड चौक, वाघ बिल्डिंग, त्रिकोणी बगीचा, पाच पाऊली देवी, बस स्थानक, विश्रामगृह मार्गे बळीराजा स्मारक येथे येऊन समारोप करण्यात आला. मिरवणुकी वेळी रस्त्यावर महिलांनी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन केले. जय जिजाऊ जय शिवराय, ईडा पिडा टळो.. बळीचे राज्य येवो अशा घोषणा करण्यात आल्या. मिरवणूकीचा खर्च भागविण्यासाठी स्व इच्छेनुसार काहींनी आपली मदत जाहीर केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील, एस.एम.पाटील, बाजार समितीचे संचालक विजय पाटील, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक रामकृष्ण पाटील, नगरसेवक श्याम पाटील, निलेश साळुंखे, यादव, संदेश पाटील, प्रशांत निकम, सौ छाया सोनवणे, पुनम ठाकरे, शशिकला पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कदम, नगावचे सरपंच महेश पाटील, शेतकी संघाचे संजय पुनाजी पाटील, शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, श्रीकांत चिखलोदकर, सयाजीराव कापडणेकर, अरुण देशमुख, संजय सूर्यवंशी, आर.पी.पवार, डॉ.विलास पाटील, मुन्ना शेख, लक्ष्मण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.लिलाधर पाटील, विनोद कदम यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आभार मानले. मिरवणूक यशस्वीतेसाठी बळीराजा समितीचे दिलीप पाटील, संजय बाबा, शिवा पाटील, प्रकाश पाटील, गहिनीनाथ, उमेश, अण्णा पाटील, संजय पाटकरी, अमोल पाटील, दत्तू अण्णा पाटील, रवी आप्पा पाटील, बापुराव ठाकरे, अनंत सूर्यवंशी, आबा चौधरी, डॉक्टर युवराज पाटील, प्रदीप पाटील, नरेंद्र अहिरराव, अनिस शेख, लक्ष्मण पाटील, वाघ सर यांचेसह अमळनेर येथील जय अंबे मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र परिवार, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
