प्रताप नगर येथे मराठा सेवा संघाची बैठक संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचा नोंदविला निषेध


अमळनेर : येथील मराठा सेवा संघाची मासिक बैठक रविवार, दिनांक १३ रोजी प्रताप नगर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य अरुणराव बाबुराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्वप्रथम शिवश्री अरुण देशमुख, शिवश्री कैलास पाटील, शिवश्री संजय सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना गायिली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

निषेध..!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात विविध संघटना आंदोलन करीत आहेत. याबाबतची पार्श्र्वभूमी डॉ.विलास पाटील यांनी मांडली. त्यास मराठा सेवा संघाचा पाठिंबा देत सर्वानुमते तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

मराठा सेवा संघ व शिवरथ प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने प्रथमच प्रतापनगर येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भव्य शिवजयंती सोहळा व दिनांक २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्वच स्तरावर भरभरुन मिळालेले सहकार्य, नियोजनाची प्रशंसा करण्यात आली. अमळनेर शहरात क्रांतीस्मारक उभारण्याकामी केलेले प्रयत्न व पुढे काय करता येईल ? याबाबत शिवश्री प्रशांत निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याबाबत मते जाणून घेण्यात आली. मराठा सेवा संघाचे नवीन सदस्य वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही करण्यात आले. गतकाळात दु:खद निधन झालेल्यांच्या मृतात्म्यास शांती मिळावी यासाठी शिवांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित नवीन सदस्यांचे स्वागत तसेच बैठकीचे यजमानपद स्विकारल्याबद्दल शिवश्री संदीप खैरनार यांचा कुटुंबियांसह यावेळी सत्कार करण्यात आला. बैठकीस मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, सचिव प्रेमराज पवार, उपाध्यक्ष बापुराव ठाकरे, कैलास पाटील, डॉ.विलास पाटील, संजय सूर्यवंशी, संदेश पाटील, प्रशांत निकम, अरुणराव देशमुख, अशोक पाटील, संदीप खैरनार, लक्ष्मण पाटील, श्रीकांत चिखलोदकर, प्रा.बी.ए.पाटील, आर.टी.चव्हाण, आर.बी.पाटील, नरेंद्र अहिरराव, किरण पाटील, रामकृष्ण बाविस्कर, भगवान देवरे, रविंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!