‘अंतरिक्ष’ च्या रूपाने झाबक परिवार चा नवा संकल्प

अंतरिक्ष कन्स्ट्रक्शन व अंतरिक्ष दातांचा दवाखाना अमळनेरकरांच्या सेवेत

अमळनेर : येथील न्यू प्लॉट भागातील झाबक परिवाराने नवा संकल्प करत शहरात अंतरिक्ष दातांचा दवाखाना तसेच अंतरिक्ष कन्सल्टन्सी व कन्स्ट्रक्शन चा भव्य शुभारंभ नुकताच दिनांक ५ मार्च रोजी करण्यात आला. संगमनेर येथील सुप्रसिध्द दंत चिकित्सक डॉ.मनोजकुमार थोरात, श्रीमती लताबाई झाबक, सौ.रेखा झाबक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सर्व सोयी सुविधांनी सजलेल्या या नव्या व्यवसायामुळे अमळनेर शहरच नव्हे तर तालुक्यातील अनेकांना उपयोग होणार आहे. मुळातच फर्मला साजेसं नाव आकाशाला गवसणी घालेल अशा अपेक्षेने पुढील वाटचाल असेल असा विश्वास झाबक परिवाराने व्यक्त केला आहे.

शहरातील स्व.एच.एम.झाबक सर यांचे नातु व सुरेश एजन्सीचे संचालक राजेंद्र झाबक यांचे चिरंजीव इंजि. कल्पेश झाबक व डॉ.शुभम झाबक या दोन्ही बंधूंनी उच्च शिक्षण घेऊन पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी व्यवसाय न करता, आपल्या जन्मभूमीत व्यवसाय करण्याचे धाडस दाखविले आहे. बांधकाम क्षेत्रात काम करताना इंजि. कल्पेश झाबक यांना इंटेरियर डिझायनर म्हणून पत्नी सौ.खुशबू झाबक यांची साथ लाभणार आहे. न्यू प्लॉट भागात भगिनी मंडळ शाळेसमोर भव्य वास्तूत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शहर व परिसरातील वैद्यकीय, बांधकाम, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी वर्गासह समाजबांधव उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!