पैलाड भागातील कै.नारायण झिपरू पाटील प्राथमिक विद्या मंदिर शाळेतआबासाहेब व.ता.पाटील जयंती निमित्त कार्यक्रम

शाळेतील विद्यार्थी यांची घेण्यात आली चित्रकला स्पर्धा

अमळनेेर : येथील पैलाड भागातील कै.नारायण झिपरू पाटील प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे संस्थापक शिक्षण महर्षी, पितृतुल्य आबासाहेब व.ता.पाटील यांच्या ७५ व्या जयंती निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले. प्रथम स्मृतीशेष आबासाहेब व.ता.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्र माता राजमाता माॅसाहेब जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्या नंतर शाळेतील विद्यार्थी यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सर्वच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर चित्र रेखाटले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ जळगांव जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, खा.प्रा. शिक्षक पतसंस्था जळगांव चेअरमन व खा.प्राथमिक शाळा अमळनेर केंद्र प्रमुख नरेंद्र आहिरराव, मुख्याध्यापक विकास पाटील, बापूराव आनंदराव पाटील, संदीप पवार, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!