मारवड महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन

अमळनेेर : तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात आज दिनांक २३ मार्च रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून भगतसिंगांच्या विचारांची प्रासंगिकता मांडली. प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भगतसिंगांच्या योगदानाबद्दल प्रकाश टाकून आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. यानंतर सागर कोळी याने शहिद भगतसिंगांचे क्रांती काव्य म्हटले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक सागर कोळी याने तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका विद्यार्थीनी ज्योत्स्ना निकम हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!