मारवड मंडळातील शेतकरी बांधवाना नुकसान भरपाई मिळण्याची आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमळनेर : महाराष्ट्र राज्याच्या ज्वलंत प्रश्न ओबीसी आरक्षण बाबत शासन स्तरावरून योग्य पाठपुरावा करून न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे जाऊन नुकतीच भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार शिरीषदादा चौधरी, धनंजय महाजन, बाळासाहेब संदानशिव, पंकज चौधरी, दीपक चौघुले आदी उपस्थित होते.
या भेटी दरम्यान २०१९ मध्ये जुलै व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे अमळनेर तालुक्यातील मारवड मंंडळ वगळता इतर मंडळातील शेतकरी बांधवाना २० हजार ४०० एवढे अनुदान (सानुग्रह) भरपाई म्हणून मिळाली होती. मारवड मंडळातील ३२ गावांतील शेतकरी बांधवाना अजूनही भरपाई मिळालेली नाही. नुकसान भरपाई न मिळाल्याने हवालदिल झालेल्या मारवड मंडळातील ३२ गावांतील शेतकरी बांधवाना त्याच धर्तीवर तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेकडे केली आहे. या बाबत योग्य निर्णय तात्काळ घेतला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!