बालगोपालांनी साकारल्या वेगवेगळ्या वेशभूषा
अमळनेर : येथील विविध शाळांमध्ये विविध वेशभूषा करीत विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनीही दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला.
सरस्वती विद्या मंदिर, अमळनेेर
श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर येथे श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याचा उत्सव बाळगोपालांच्या आणि कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी टांगलेली दहीहंडी फोडण्यासाठी मुली व मुलींनीही ३ थर मानवी मनोरे बनवून हंडी फोडत दहीहंडी उत्सव साजरा केला. शाळेतील बालगोपालांच्या दहीहंडी उत्सवात शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे, शिक्षक आनंदा पाटील, संगीता पाटील, गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर आदी शिक्षक कर्मचारी तसेच शितल पाटील, पूनम पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, किरण पाटील आदींनी सहभाग घेतला.
अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, अमळनेेर
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालगोपालांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करीत विविध कार्यक्रम व नाटिका शाळेत घेण्यात आल्यात. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. बाळ गोपाळांनी श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत आपली भूमिका साकारली . श्रीकृष्ण राधा व सुदामा यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी त्यांची वेशभूषा परिधान करत मित्रतेवर आधारित नाटिका सादर केली. कृष्ण राधा व सुदामा यांच्या वेशभूषेत असलेल्या बाळगोपाळांचे चित्रीकरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन प्रा.अश्विनी चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी कामकाज पाहिले.