पिंगळवाडे : येथील जिल्हा परिषद शाळेतील बाहेरगावाहून पायी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच शिक्षक मित्रपरिवाराकडून मिळालेल्या ९ सायकली व निवृत्त प्राध्यापक डॉ.यु.जी.देशपांडे यांचेकडून मिळालेल्या लेखन साहित्य वितरणाचा कार्यक्रम अमळनेर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी पी.डी.धनगर, कल्पना वाडीले यांचेसह सरपंच मंगला देशमुख, शा.व्य.समिती अध्यक्षा कल्पना पारधी, ग्रा.पं.सदस्य समाधान पारधी, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.यु.जी.देशपांडे, पत्रकार उमेश काटे, मारवड शाळेचे शिक्षक दिनेश मोरे, प्रमोद देशपांडे, मुख्याध्यापिका वंदना ठेंग, उपशिक्षक रविंद्र पाटील, वंदना सोनवणे, ग्रामस्थ शरद देशमुख, दत्तु पाटील, विक्रम शेलार तसेच मेहेरगाव येथील पालक निंबा भिल, काशिनाथ भिल, संजय भिल, महारु भिल, विजय भिल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शाळेतील उपशिक्षक तथा साने गुरुजी शैक्षणिक विचारमंचचे समन्वयक दत्तात्रय सोनवणे यांनी नाविण्यपुर्ण सायकल उपक्रमाचा प्रवास उलगडला. कार्यक्रमात शाळेमार्फत करण्यात आलेल्या आवाहनानुसार तब्बल नऊ सायकल भेट स्वरुपात देणारे साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच मित्र परिवारातील सदस्य दर्शना पवार (कार्यवाह, सानेगुरुजी स्मारक अमळनेर), उमेश काटे (उपशिक्षक, विजयनाना आर्मीस्कूल अमळनेर), दत्तात्रय सोनवणे (उपशिक्षक, जि.प.शाळा पिंगळवाडे), अशोक पाटील (उपशिक्षक, जि.प.शाळा शिरुड), प्रविण पाटील (पदवीधर शिक्षक, जि.प.शाळा पिंगळवाडे), चंद्रकांत देसले (उपशिक्षक, जि.प.शाळा कलाली), प्रदीप चव्हाण (पदवीधर शिक्षक, जि.प.शाळा पळासदडे), दिनेश मोरे (उपशिक्षक, जि.प.कन्या शाळा मारवड), आनंद महाजन (वैद्यकीय प्रतिनिधी, ओयासिस फार्मा) यांचाही शाळेमार्फत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानंतर मेहेरगाव येथून शाळेत पायी येणारे आदिवासी कुटुंबातील गरजू व होतकरु विद्यार्थी कविराज गायकवाड (पाचवी), कृष्णा सोनवणे (पाचवी), रुपा भिल (पाचवी), भारती भिल (पाचवी), वर्षा भिल (पाचवी), रोहन भिल (सातवी), सोहन भिल (सातवी), प्रिया सोनवणे (सातवी), भाग्यश्री गायकवाड (सातवी) यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सायकली वितरीत करण्यात आल्या.
कार्यक्रमात प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील निवृत्त प्राध्यापक डॉ.यु.जी.देशपांडे यांनी आपल्या धर्मपत्नी शोभाताई देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या लेखन साहित्याचे वितरण व पालक दत्तु भाईदास पाटील यांनी शाळेसाठी भेट दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तसेच मारवड कन्याशाळेचे उपशिक्षक दिनेश मोरे यांना जि.प.जळगांव तर्फे सन २०२१ चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बाला उपक्रमातंर्गत लोकसहभाग म्हणून सरपंच मंगला देशमुख यांनी आपले पती कै.बाळासाहेब देशमुख यांचे स्मरणार्थ ध्वजस्तंभ बांधकाम करुन देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील इ.७ वी च्या विद्यार्थीनी श्रुती पाटील व मयुरी पाटील यांनी केले. आभार शाळेतील पदवीधर शिक्षक प्रविण पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी, साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन परिवारातील सदस्य यांनी परिश्रम घेतले.