अमळनेर : येथील गलवाडे, लोण खुर्द, लोण बुद्रुक, लोण चारम, भरवस या गावांमध्ये चोरी व गुन्हे यांना आळा बसावा म्हणून गावांनी लोकवर्गणीतून संपूर्ण गावांत कॅमेरे लावण्याबाबत जनजागृतीचा अभिनव उपक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व आधार फाउंडेशन चे अध्यक्ष अशोक आधार पाटील यांनी नुकताच राबविला.
गलवाडे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन समस्त नागरिकांना होणाऱ्या चोऱ्या, घरफोडी, पशुधन चोरी, मंगळसूत्र चोरी व इतर गुन्हे कसे घडतात ? त्यास प्रतिबंध कसा घालावा ? या बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात कृषिधन व गावांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊ असे आधार फाउंडेशन तर्फे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी लोण परिसर गावातील शिवसेना तालुका प्रमुख किसन पाटील,मधुकर पाटील,आबा पाटील,विवेक पाटील,विनोद पाटील, सुदाम पाटील, विनायक पाटील, बाळासाहेब पाटील, मोतीलाल पाटील, शिवाजी पाटील,नाना पाटील, देवचंद भिल, ज्ञानेश्वर पाटील, शैलेश पाटील आदी मान्यरांसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
भरवस ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत गावातील नागरिकांशीही उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,अशोक पाटील यांनी संवाद साधला.न यावेळी प्रकाश शांताराम पाटील, विजय पाटील, अरुण पाटील, ओंकार पाटील, रामराव पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, किशोर पाटील, उदय पाटील, सूभाष पाटील, उमेश पाटील, प्रकाश पाटील, उखर्डू मिस्तरी, ज्ञानेश्वर पाटील, देविदास पाटील, मंगेश पाटील, सतीश पाटील, प्रमोद पाटील, दिग्विजय पाटील, दिलीप पाटील, सुशील पाटील, राजेंद्र पाटील, अरुण पाटील, राहुल पाटील, अक्षय पाटील, भिला पाटील, अरुण पाटील, वैभव पाटील, सागर पाटील, रवींद्र पाटील, विनोद पाटील, इतर ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.