
अमळनेर : समता परिषद जळगाव शाखेतर्फे नेमणूक केलेल्या अमळनेर तालुका कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान व विचार विनिमयासाठी धनदाई महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली. समता परिषद ही गुणवत्तेला प्राध्यान्य देणारी संस्था आहे. जिल्ह्यात इंग्रजी विषयाची मूलभूत मांडणी करणारी ही अप्रतिम संस्था. उत्कृष्ट टीम वर्क करणारी समता परिषद शैक्षणिक व सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम सातत्याने करीत आली आहे. संस्थेच्या अमळनेर तालुक्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक परिषद कार्यकारणीची निवड व विचारविनिमय करून पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान प्राथमिक पतपेढीचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी भूषविले. विचारमंचावर जिल्हा कार्यकारिणी माध्यमिकचे वरिष्ठ पदाधिकारी सोपान भवरे, समता प्राथमिक शिक्षक परिषद पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अजय भामरे उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांचे सत्कार झाले. त्यानंतर निवड झालेल्या सभासदांचा परिचय करून निवडीबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात सोपान भवरे यांनी समता म्हणजे काय? समता परिषद काय कामे करते ? संस्थेची कार्यपद्धती तसेच अशा संघटनेचे महत्व का आहे ? यावर सविस्तर विचार मांडले. यानंतर अजय भामरे यांनी शिक्षक परिषदेने गुणवत्ता निर्माण करणाऱ्या शिक्षकांसाठी पुरस्कार कसे दिले जातात याबाबत माहिती दिली. समता शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी ऑनलाईन उद्बोधन करून समता परिषदेची वाटचाल कशी होत आली. त्याचप्रमाणे समता परिषदेत कार्यकर्त्यांचे निकष काय असतात ते सांगितले. सभेचे अध्यक्ष श्री कैलास पाटील यांनी पारदर्शक संघटना म्हणून शिक्षक परिषदेचे काम सर्वोत्तम आहे असे मत मांडून काही लुबाडणाऱ्या संघटनेचे उदाहरण दिले.
याप्रसंगी मार्गदर्शक नरेंद्र हिंमतराव अहिरराव, प्राथमिकचे तालुकाध्यक्ष बापूराव ठाकरे, सचिव अनंतकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष अशोक पाटील, महिला उपाध्यक्ष अर्चना वाघ, दिनेश मोरे, चतुर पाटील, उज्ज्वल मार्कंडेय, किरण मोहिते, माध्यमिक चे सचिव रामेश्वर पवार, उपाध्यक्ष हनुमंत पाटील, चंद्रशेखर ठाकूर, दिपक पाटील, अतुल बोरसे, जितेंद्र बेडसे आदी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका सभेसाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन अशोक पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज बिऱ्हाडे, दत्ता सोनवणे, योगेश पाने, दिनेश मोरे यांनी प्रयत्न केले.