सामाजिक उपक्रम राबवित निर्माण केला आदर्श
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाने काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी सामाजिक उपक्रम राबवित एक आदर्श निर्माण केला. गावातील गोवर्गीय जनावरांना ‘लंपी’ या आजाराची लक्षणे दिसून आल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळातील कार्यकर्त्यांकडून ‘लंपी’ रोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. जनावरांसाठीच्या लसी व गोठ्यात फवारणीसाठी आवश्यक औषधी देखील सरपंच, उपसरपंच यांच्याकडे सुपूर्द केली.
पशुवैद्यकीय दवाखाना, अमळगाव यांचे सहकार्याने डॉ.सुरज बोराखेडे व सहकारी यांनी गोवर्गीय जनावरांना लसीकरण केले. एकूण १७० जनावरांना ‘लंपी’ रोगाचे प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण केले. रोगराई पासून संरक्षण व्हावे यासाठी गुरांच्या गोठ्यात देखील लवकरच औषध फवारणी करण्यात येणार आहे.
याप्रसंगी भैरवीताई वाघ-पलांडे, आनंदा देवराम कापडे, कैलास मुरलीधर पाटील, गणेश कन्हैयालाल पाटील, रोहिदास बंडू कापडे, मधुकर दौलत पाटील, प्रसाद सुर्यकांत कापडे, विश्वास देवराम कापडे, सिध्दीविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.