अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जि.प.उच्च प्राथमिक मराठी शाळेत काल दि.५ सप्टेबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या वेशभूषेत आले होते.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद कापडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सदस्य रोहीदास कापडे मुख्याध्यापक हिंमत चौधरी, शिक्षक पंकज शिसोदे, अजय कोळी, दिलीप कंखरे, शिक्षिका पूनम पवार व विद्यार्थी उपस्थित होते.