समता शिक्षक परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी बापूराव पाटील तर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सुनिल वाघ

अमळनेर : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. प्राथ.शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी बापूराव आनंदराव पाटील (ठाकरे ) तर सचिव पदी अनंतकुमार धर्मराज सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी क्रिडा शिक्षक सुनिल प्रभाकर वाघ तर सचिव पदी रामेश्वर अवचितराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.भरतजी शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही विशेष सभा संपन्न झाली. याप्रसंगी रावसाहेब जगताप, प्रमोद आठवले, रणजित सोनवणे
मनोज नन्नवरे, मनिषा देशमुख, छाया बैसाणे आदी राज्य व जिल्हा पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!