
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील मूळ रहिवासी चेतन विश्वास सूर्यवंशी (वय- ३५) ह.मु. मुक्ताई वाडी, ढेकूरोड, अमळनेर यांचे आज रविवार पहाटे १२.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्वप्निल विश्वास सूर्यवंशी यांचे ते बंधू होत. अमळनेर येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुक्ताई वाडी, ढेकूरोड, अमळनेर येथील निवासस्थानापासून सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.