अमळनेर : मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापन दिन गुरुवार ( दि.१ सप्टेंबर ) रोजी साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर नाना निकम यांचे शुभहस्ते तहसील कचेरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात छोटेखानी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे यांनी प्रास्ताविक केले. शिवश्री मनोहर नाना निकम म्हणाले की, वैचारिक क्रांती करुन नवसमाज घडवणाऱ्या मराठा सेवा संघाने दगड आणि स्फोटकांनी आमच्या हाती पुस्तके दिली. छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी विचाराने संघ आपली वाटचाल करीत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. डॉ.लिलाधर पाटील यांनीही आपल्या मनोगतात संघाची भूमिका मांडली.
यावेळी शिवश्री मनोहर नाना निकम, शिवश्री कैलास पाटील, शिवश्री डॉ.लिलाधर पाटील, शिवश्री डॉ.विलास पाटील, शिवश्री रामेश्वर भदाणे, शिवश्री अशोक पाटील, शिवश्री बापूराव ठाकरे, शिवश्री प्रेमराज पाटील, शिवश्री कुणाल पवार, शिवश्री श्रीकांत चिखलोदकर, शिवश्री संजय सूर्यवंशी, शिवश्री प्रशांत निकम, शिवश्री पी.एस.पाटील, शिवश्री रामकृष्ण पाटील, शिवश्री निंबा पाटील, शिवश्री प्रफुल्ल पाटील, शिवश्री अनंतकुमार सूर्यवंशी, शिवश्री वाल्मिक मराठे, शिवश्री नरेंद्र अहिरराव, शिवश्री चंद्रकांत पाटील, शिवश्री ठाकूर दादा, शिवश्री अजय भामरे, शिवश्री रविंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. योगायोगाने शिवश्री प्रशांत निकम यांचा वाढदिवस असल्याने अमळनेेर तालुका मराठा सेवा संघातर्फे त्यांना पेढा भरवून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.