प्रताप महाविद्यालयातील कु.स्नेहल पाटील आणि रोहित पाटील यांना टेनिस चे विजेतेपद

दोन्ही टेनिसपटूंची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेनिस स्पर्धेसाठी निवड

जळगाव : येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे आणि एरंडोल विभागाचे टेनिसपटू सहभागी झाले होते. आंतरविभागीय टेनिस स्पर्धेमध्ये एरंडोल विभाग प्रथम येऊन प्रतापच्या खेळाडूंनी निर्विवाद विजय प्राप्त केले. प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर चे टेनिस खेळाडू चि . रोहित सर्जेराव पाटील (S.Y.B.A.), कु. स्नेहल पाटील (F.Y.BSc) यांनी विजेतेपद पटकावले. दोन्ही टेनिसपटूंची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेनिस स्पर्धेसाठी स्तुत्य निवड झाली.

या यशाबद्दल खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष सौ. माधुरीताई पाटील, जितेंद्र देशमुख, विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष CA निरज अग्रवाल, जेष्ठ संचालक हरी भिका वाणी, संचालक योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, ज्येष्ठ संचालक विनोद पाटील, कल्याण पाटील, खा. शि. मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन, सहसचिव व अधिसभा सदस्य डॉ. धिरज वैष्णव , उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, प्रा. डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे, वरिष्ठ जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर ,IQAC प्रमुख डॉ. मुकेश भोळे, क्रीडा संचालक प्रा.डॉ.सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, प्रशिक्षक प्रा. विजय शिंदे, कुलसचिव राकेश निळे, क्रीडा शिक्षिका प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी, खेळाडू यांनी स्नेहल पाटील आणि रोहित पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!