अमळनेरला दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते झाले बक्षिस वितरण

अमळनेर – तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बक्षीस पात्र विद्यार्थी शिक्षकांसमवेत माजी आमदार स्मिताताई वाघ, भैरवीताई वाघ- पलांडे, किशोर अहिरे, प्रकाश पाटील, शर्मिला चव्हाण, रत्नमाला कुवर आदी

अमळनेर : तालुक्यातील देवगाव-देवळी येथे पंचायत समिती, सरस्वती आयटीआय व श्री साई कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. तालुक्यावर निवड झालेल्या उपकरणांची जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात मांडणी केली जाणार आहे. माजी आमदार स्मिताताई वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा दूध संघाच्या संचालिका भैरवीताई वाघ-पलांडे, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर अहिरे, श्री साई कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रकाश पाटील, गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, कल्पना वाडीले , संस्थेच्या सचिव रत्नमाला कुवर, शापोआ अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर, परीक्षक संजय पाटील, डी.ए.धनगर, सूर्यकांत बाविस्कर, नवनीत सपकाळे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे हा एक विज्ञानाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. अनेक विद्यार्थ्यांमध्ये बालवैज्ञानिक लपलेले असतात. त्यांच्यातील उपजत गुण वृद्धिंगत झाल्यास नवीन संशोधन उदयास येते. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्याचे भावी शास्त्रज्ञ तयार होत आहेत, असे मत व्यक्त केले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, किशोर अहिरे, संजय पाटील, ज्ञानेश्वर कुवर, तन्वी सोनार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उमेश काटे व निरंजन पेंढारे यांच्या सह व्ही-स्कुल ॲप मध्ये शैक्षणिक व्हिडिओ व शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले. विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे व उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल असा…

सहावी ते आठवी विद्यार्थी गट : प्रथम : दिपाली पाटील, विशाखा पाटील (गणित प्रतिमा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळासदडे), द्वितीय : ऋग्वेद शिंदे, हर्षदा पाटील (सस्टेनेबल एग्रीकल्चर अँड इको फ्रेंडली मटेरियल, ऍड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर), तृतीय : सागर पाटील (आर्मी कंटोनंट, श्री बी बी ठाकरे माध्यमिक विद्यालय वावडे) उत्तेजनार्थ : अश्विनी पाटील (स्वच्छता व आरोग्य, साने गुरुजी कन्या विद्यालय अमळनेर), रोहित पाटील, टिळक पाटील (सोलर रस्ते, स्व.श्रीराम गबाजीराव सोनवणे विद्यालय भरवस)

नववी ते बारावी विद्यार्थी गट : प्रथम : साहिल पिंजारी, कुणाल पाटील (गणितीय मॉडल, बालाजी विद्यालय गांधली- पिळोदे), द्वितीय : यश चौधरी, अजिंक्य सोनवणे (स्वयंचलित पथदिवे, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर), तृतीय : तन्वी सोनार (रेल्वे वाहतूक यंत्रणा, डी आर कन्या शाळा अमळनेर), उत्तेजनार्थ : दुर्गेश देसले, यदेश बडगुजर, कृष्णा पवार (मेडिसिन क्यूआर कोड एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेर), मयूर पाटील, पुष्पराज पाटील (रेन वॉटर हार्वेस्टिंग, नूतन माध्यमिक विद्यामंदिर रुंधाटी-मठगव्हाण)

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट : प्रथम- एस एस बोरसे (शालेय ॲप, किसान माध्यमिक विद्यालय जानवे), द्वितीय- प्रमिला रमेश अडकमोल (गणितीय उपकरण, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, फापोरे), तृतीय- प्रदीप सोनवणे (धमाका बंदूक, माध्यमिक विद्यालय, ढेकू)

उच्च प्राथमिक शिक्षक गट : प्रथम- ज्ञानेश्वर कुवर (खेळातून आरोग्य व स्वच्छता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोद) द्वितीय- उमेश पाटील (प्रकाश परावर्तन व ध्वनी कंपन, शांतिनिकेतन प्राथमिक विद्यालय अमळनेर)

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!