अमळनेर : येथील प्रतापीयन्स प्रबोधिनी माजी विद्यार्थी- माजी शिक्षक संघटना तर्फे तीन जणांना नुकताच “प्रतापीयन्स प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. येथील जी.एस.हायस्कूल च्या आयएमए हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात २०२० या वर्षीचा “प्रतापीयन्स प्रेरणा पुरस्कार” विजयनाना पाटील आर्मी स्कुलचे उपक्रमशील शिक्षक तथा पत्रकार उमेश काटे यांना, २०२१ या वर्षीचा पुरस्कार जी.एस.टी.चे राज्य कर उपायुक्त मधुकर पाटील यांना तर २०२२ या वर्षीचा पुरस्कार निवृत्त अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना प्रा.डॉ.एस.ओ.माळी यांच्या हस्ते देण्यात आला. जी.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर अध्यक्षस्थानी होते.
प्रतापीयन्स प्रेरणा पुरस्कार मिळणे म्हणजे तमाम शिक्षकांचा सन्मान असून हा पुरस्कार सर्व शिक्षक, गुरुजन वर्ग, आईवडील, मूलगी यांना अर्पण करीत असल्याचे उमेश काटे यांनी सांगितले. यावेळी साहित्यीक सुदाम महाजन, कर उपायुक्त मधुकर पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. डी. ए धनगर यांनी सूत्रसंचालन केले. विजयसिंग पवार, शरद पाटील, निरंजन पेंढारे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. या कार्यक्रमाला शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच, सीसीएमसी स्पर्धा परीक्षा केंद्र, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी सह निवृत्त मुख्याध्यापक एच.बी.जाधव, यशोदीप सोनवणे, मिलिंद सोनवणे, रत्नाकर पाटील, मनोहर नेरकर, सुनिता पाटील, व्ही.एन.ब्राम्हणकर, दत्तात्रय सोनवणे, चंद्रकांत पाटील, प्रा.भिमराव महाजन, ईश्वर महाजन, रवींद्र मोरे, बी.एस.पाटील, आर.एल.माळी, विशाल देशमुख, एस.ए.बाविस्कर, गोपाल हडपे, टी.के.पावरा, शिवाजी पाटील, महेश बोरसे, प्रमोद पवार, वैशाली सोनवणे, प्रा.निकिता काटे, दक्षता काटे आदी उपस्थित होते.