अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथील रहिवासी वत्सलाबाई भिला पाटील यांचे आज सकाळी साडेसातला वृद्धापकळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.१) सकाळी नऊला शिरुड (ता.अमळनेर) येथील राहत्या घरुन निघणार आहे. त्या भिला पाटील यांच्या पत्नी तर सुनिल पाटील, अनिल पाटील, नंदलाल पाटील व प्राथमिक शिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री होत.